Thursday, June 22, 2017

Dhapate

धपाटे 


साहित्य :ज्वारीचे पीठ ,गव्हाचे पीठ ,बेसन ,लसूण,कोथिंबीर,मीठ,ओवा,जिरे,हिंग,हळद,लालतिखट,दही किंवा ताक ,भाजण्यासाठी तेल.. (४ धपाटे)

कृती :
सर्वप्रथम ज्वारीचे पीठ २ चमचे,गव्हाचे पीठ १ चमचा,बेसन१ चमचा एकत्र करून घ्या. 
त्यात मीठ चवीपुरते  लालतिखट ,हळद,हिंग घाला. 
लसूण कोथिंबीर ओवा जिरे मिक्सरमध्ये वाटून पिठात टाका. 
ताका त किंवा दह्यात भिजवून घ्या. 
पोळी सारखे लाटून किंवा भाकरीसारखे थापून धपाटे करा. 
तव्यावर तेल सोडून खमंग भाजून घ्या. 
गरम गरम लोण्याबरोबर किंवा दह्याबरोबर छा न लागतात . 


दह्याची चटणी धपाट्यांसाठी .. 

साहित्य :दही,मीठ,तिखट,कोथिंबीर,कढीपत्ता,शेंगदाण्याचं कूट,बारी चिरलेला कांदा 

कृती:एका वाटीत दही चमचाभर कूट,मीठ,तिखट,कांडा एकत्र कारण थोडीशी पातळ चटणी बनवा लागल्यास पाणी घाला. वरून कढिपत्ता  कोथिंबिरीची फोडणी घाला. 

धपाट्यांसोबत  उत्कृष्ट लागते.




No comments:

Post a Comment