Thursday, June 22, 2017

pithal

पिठलं


साहित्य:बेसन पीठ २ चमचे,मीठ,तिखट,हळद,हिंग,कोथिंबीर,लसूण,कांदा ,तेल ,पाणी ..

कृती:पद्धत १

सर्वप्रथम एका भांड्यात पीठ चवीपुरते मीठ,छोटा चमचा तिखट,चिमूटभर हळद,हिंग घालून पाणी घालून सरसरीत पीठ कालवून घ्या. भाज्यांच्या पिठासारख असावं साधारण.. जास्त घट्ट नको.

लसूण,कोथिंबीर,जिरे मिक्सरला वाटून घ्या..

तेलाची फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा  आणि वाटण घालून परतवून घ्या.

तयार पिठाचे मिश्रण वरून टाका. गाठी होऊ नयेत म्हणून चमच्याने ढ वळा .

वरती झाकण ठेऊन १० मिन शिजू द्या.

गरम गरम पिठलं वरून कच्च तेल आणि लिंबू पिळू न  भाकरीसोबत सर्व्ह करा.

पद्धत २

तेलाची फोडणी करून कांदा  आणि वाटण परतून घ्या.

त्यात दीड कप पाणी टाकून उकळी आणा .

यात बेसन तिखट मीठ हिंग हळद यांचं कोरड मिश्रण टाका.

झाकण ठेऊन वाफ येऊ द्या.




No comments:

Post a Comment